अनाथ मुलांची हृदयस्पर्शी कथा मांडणारा कन्फ्यूजन

_DSC0092

पुणे: सर्वा प्राॅडक्शन निर्मित ‘कन्फ्युज’ हा मराठी चिञपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. नवीन चेहरे या चिञपटात रसिकांना पहायला मिळतील. अभिजीत सोनावणे, पुण्यकर उपाध्याय आणि रक्षंदा थुल मुख्य भुमिकेत दिसतील. या चिञपटामध्ये अनाथ मुलांची हद्यस्पर्शी कथा सांगताना प्रेम, डान्स या विषयांवरती भाष्य करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. चिञपटामध्ये तीन गाणी आहेत. या चिञपटाची विशेष बाब म्हणजे यात एक आयटम साॅग आहे. प्रशांत चंद्रकांत सुर्वे यांनी चिञपटाची कथा पटकथा लिहिली असुन दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे .चिञपटाची निर्मिती सचिन सांळुखे आणि प्रशांत सुर्वे यांची आहे. चित्रपटाचे एक्सिक्टिव्ह प्रोड्युसर राहुल कांबळे यांनी बघितले आहे. सिनेमॅटोग्राफी मयुरेश जोशी यांनी केली आहे. संगीत मोनू अर्जामेरी, राजू म्हासेकर, गुरू मेहेर यांचे असून दर्शन सारोलकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. सुरेखा खुडची, माधव अभ्यंकर, राहुल लोहगावकर, प्रसाद सुर्वे, राहुल बेलापुरकर, शर्वरी लोकरे, धनंजय निकम, आशुतोष वाडेकर आदि कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचे गीतकार सचिन तळे आणि संगीतकार आदर्श शिंदे आहेत. एकंदरीत फार मजेशीर कन्फ्युज अशी कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.