अभिनय आणि लेखन माझा श्वास- शिवानी रांगोळे

13737456_10210568335151451_3096474387026814079_o

डबल सिट, फुंतरु या चित्रपटांमधुन आपल्या अभिनयाची वेगळी चुणूक दाखवलेली शिवानी रांगोळे ‘& जरा हटके’ या प्रकाश कुंटे दिग्दर्शित चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली. झी युवाच्या ‘बंद मस्का’ या मालिकेत लीड रोल करते आहे. अत्यंत गुणी, गोड तितकिच चुलबुली, संवेदनशील आणि लेखनाची आवड असणारी ही नव्या दमाची अभिनेत्री मराठी चित्रपटांना मिळालीय. यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या या खास गप्पा…

मूलाखतकार : मोतीराम पौळ
फोटो : प्रणव सिंग आणि शिवानी रांगोळे फेसबुक पेज

प्रश्न : नमस्कार शिवानी. ‘अक्षरदान’मध्ये तुझं स्वागत. ‘& जरा हटके’ या तुझ्या नुकात्याचं प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल काय सांगशील. यात तू प्रमुख भूमिका केली होती.

–  ‘& जरा हटके’ या चित्रपटात मी ‘आस्था’ नावाचं कॅरेक्टर केलं. ती सतरा वर्षाची होती. तीच्या आईने तिला सिंगल हॅन्डेड वाढवलं आहे. डिव्होसनंतर आईच्या अत्यंत जवळ राहिल्यामुळे तिचा आईसोबत वेगळा बॉन्ड आहे. तिच्यासाठी मैत्रीण, बाबा सर्व काही आईच आहे. पण आईच्या आयुष्यात तिचा जूना मित्र आल्यामुळे तिला भीती वाटते की, माझ्या बाबांची भूमिका कोणी घेईल का? तिला तीच्या आईवर अत्यंत प्रेम आहे. ते नातं तिला टिकवायचंय. आईचं डिसीजन पण मान्य करायचंय. पण तीच्या बाबांची जागा कोणी घ्यायला नकोय, असं तिला वाटतं. कारण तीच्या बाबांवरही तिचं प्रेम आहे. आशा परिस्थितीत आस्थाला तिचा मित्र निशांत भेटतो. हा आईच्या मित्राचा मुलगा आहे. या दोघांनाही या नव्या बदलाला सामावून घेण्याची खुप इच्छा आहे. पण ते दोघ एकत्र स्ट्रगल करतात. एकत्र रहायचंय आव्हान ते चार कॅरेक्टर पेलतात. हे यात वेगळया पद्धतीने मांडलं आहे. तसेच काळानुरूप नात्यांमध्ये बदलत जाणारी भावना, वयात आलेल्या मुलीची मानसिकता & जरा हटकेमध्ये चित्रित केली आहे. मृणाल कुलकर्णी, बंगाली अभिनेते इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन यांच्याबरोबर काम करतांना खुप मज्जा आली.

प्रश्न : आस्थाची भूमिका तुला कशी मिळाली. तुझी निवड कशी झाली?

– प्रकाश कुंटे सरांनी माझं ‘डबल सीट’ चित्रपटातील काम बघितलं होतं. तो छोटा रोल होता. ते काम पाहून मला त्यांनी फोन केला. पण ते करेक्टर सेंसिटिव्ह आणि सेंसिबल होतं. त्यांना अशाच प्रकारच्या कॅरेक्टरची गरज होती. जे संवेदनशीलपणे विचार करू शकेल. शिवाय मी साहित्याची विद्यार्थिनी आहे. आस्थालाही साहित्याची खुप आवड आहे. त्यामुळे हा सर्व योग जुळून आला आणि आस्था ही प्रमुख भूमिका मला करायला मिळाली.

प्रश्न : फुंतरु आणि & जरा हटके या दोन्ही चित्रपटांमधील भूमिकांकडे तू कशी बघतेस? काय वेगळेपणा तुला जानवतो?

– फुंतरु आणि & जरा हटके हे दोन्ही चित्रपट एका अर्थाने जरा सारखे आहेत. फॉरमेट सारखा नसला तरी विचार मांडायचाय तो नवा आहे. कॅरेक्टर खुप नविन आहेत. फुंतरु एक पहिली सँसेक्शन मुव्ही होती, त्यात वेगळ्या विषयावर भाष्य केलं होतं. तसचं जरा हटके मध्ये दोन व्यक्तींमध्ये सप्रेशन होत ते दरवेळी निगेटिव्हच असेल, अस नाही. नकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे नाही बघितलं पाहिजे. आपण इगो, नात्यांना खुप महत्त्व देतो. त्यामुळे प्रत्यक्ष बदलण्याची खुप गरज आहे. डिहोस नंतरचं लग्न आपल्याकडे सहजपणे मान्य करत नाहीत. हे जरा हटके मध्ये मांडण्याचा प्रयन्त केलाय. हे दोन्ही चित्रपट मला आजच्या काळातले वाटतात.

IMG-20160721-WA0002_1

प्रश्न : मुळात तू अभिनयाकडे कशी काय वळलीस? घरी काही पार्श्वभूमी होती का?

– मला घरची अभिनयाची काही पार्श्वभूमी नाही. नगर आमचं मुळ गाव. पण आई-बाबा नोकरी निमित्त पुण्यात शिफ्ट झाले. माझा जन्म पुण्यातलाच. आई इंग्रजीची शिक्षिका आहे. तर बाबा खाजगी कंपनीत नोकरी करतात. अस असताना मी शाळेत असल्यापासून अभिनयाच्या स्पर्धा केल्यात. नाटक, कथाकथन करीत असे. राज्यनाट्य स्पर्धत तर मला अभिनयाचे दोन गोल्ड मेडल मिळाले. असा माझा अभिनयाचा प्रवास सुरु होता. त्यानंतर बारावीत असतांना ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ ही पाहिली सीरियल केली. त्यानंतर सुरुवातीला अभिनय हे माझी आवड होती. आता ते प्रोफेशन झालं आहे. आणि मी लिहते सुद्धा. मला लिखाणाची खुप आवड आहे. वेळ मिळेल तसा मी लिहन्याचा प्रयत्न करते.

प्रश्न : अभिनयाबरोबर तुला लिखानाकडे का वळावं वाटलं? आणि काय लिहायला आवडतं तुला?

– माझे बाबा सीओईपी कॉलेजमध्ये इंजीनियरिंगला होते. त्यावेळी ते फिरोदिया, पुरुषोत्तम करंडकासाठी एकांकिका लिहायचे. त्यांना त्यावेळी लेखनाचे अनेक बक्षिसही मिळाले होते. त्यामुळे लिहन्याची प्रेरणा घरीच बाबांकडून मिळाली. लिखानाचा माझा प्रवास सुरु झाला. मी एक शार्ट फिल्म लिहली. ‘विमेन सेफ्टी ऍप’ या स्पर्धेकरिता ती लिहली होती. आम्ही ती बनवली, पाठवली आणि त्याला आम्हाला बक्षिसही मिळालं. सध्या आणखी काही स्क्रिप्ट लिहनं सुरु आहे. माझ्या ब्लॉगवर मराठी, इंग्रजी कविता लिहते. अभिनेत्रीबरोबरच मला लेखिका व्हायचंय. फावल्या वेळेत लिहण्याचा नेहमी प्रयत्न करते.

प्रश्न : तरुण पीढी वाचनाकडे वळत नाही, अशी नेहमी ओरड होते. तर तुझा वाचनाचा अनुभव कसा आहे?

– अर्थात मला वचनाची आवड आहे. द. मा. मिराजदार, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे यांची अनेक पुस्तके मी वाचलित. सिडनी शेल्डन ही माझी इंग्रजीतीत आवडती लेखिका आहे. तसेच मला कादंबरी, काल्पनिक कथा, गुढकथा वाचायला आवडतात. रत्नाकर मतकरी यांचीही पुस्तके मला आवडतात. सोशियल मिडिया बरोबरच आताची पीढी वाचनाबाबतही बरीच जागरूक आहे.

प्रश्न : अभिनय, लेखनाबरोबर तुझे आणखी काय छंद आहेत?

– वेगवेगळ्या लोकांशी संवाद करायला मला आवडतं. तसचं प्रवास करायलाही खुप आवडतं. मी आई-बाबांबरोबर नुकतीच सिक्किमला गेले होते. तिथला शांत प्रदेश, हिरवा निसर्ग, छोटी-छोटी घर, हे वातावरण मनाला भावून टाकणारं होतं. मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायलाही खुप आवडतं. सध्या कामामुळे मी पुण्यातून मुंबईला शिफ्ट झाले आहे. पण सिक्किमसारख्या शांत, सुंदर ठिकाणी आपलं एक छोटसं घर असावं वाटतं. तर मला गोड पदार्थ खायला जास्त आवडतात. त्या-त्या ठिकाणी प्रसिद्ध असणारे पदार्थ मी आवडीने खाते. जे पदार्थ खाल्यामुळे पोट भरतं आणि आनंद मिळतो. ते पदार्थ खाण्याला मी जास्त प्राधान्य देते.

13754278_1147921125231311_4569715638374560939_n

प्रश्न : तू फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकतेस. तर तुझ्या जडण-घडणीत येथील वातावरणाचा काही फायदा झाला का?

– फर्ग्युसन कॉलेजमध्ये यायचं, हे मी शाळेत असतांनाच ठरवलं होतं. तो परिसरच इतका सुंदर आहे की, तिथे प्रत्येकाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. जुन्या काळापासून अनेक महान व्यक्ती इथे होऊन गेलीत. घडली आहेत. इथलं कल्चरल वातावरण तर खुप छान आहे. मी अकरावीत असतांना कॉलेजकडून नाटक करू शकले. नंतर मुंबईला शिफ्ट झाले. इथे यूनिटी, डीसीपीलीन खुप आहे. वेगवेगळे विषय हाताळन्याची संधी मिळते. सर्वांनी मिळून प्रयत्न करणं हे इथं घडतं. एकदा सुमन करंडकात वाचिक अभिनयात मला बक्षीस मिळालं होतं. बी. ए. इंग्रजी आणि जर्मन मी फर्ग्युसनमध्ये पूर्ण केलं. नक्कीच इथल्या वातावरणाचा खुप फायदा मला अभिनयासाठी झाला.

प्रश्न: सध्या तुझे नविन काही प्रोजेक्ट्स आहेत?

– नुकताच सुरु झालेल्या झी युवा या खास तरुणाईंच्या चॅनेलवरील ‘बंद मस्का’ या मालिकेत लीड रोल करते आहे. ही मालिका सध्या जोरात सुरु आहे.

प्रश्न : आयुष्य येणाऱ्या नविन बदलाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोण कसा आहे?

– आपल्या प्रत्येकाला सतत काही तरी नविन करून बघायचं असतं.  आपण काही तरी वेगळं काम करतोय, त्याचा आनंद हा अत्यंत वेगळा असतो. पण त्यासाठी संधी मिळणं खुप महत्वाचं आहे. प्रकाश सर, रवी सर यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. यातलं कॅरेक्टर खुप अवघड होतं. ज्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत. ते मी माझ्या पद्धतीने उभं केलंय. आपण नेहमी नवनवीन काही ना काही शिकत असतो. माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. पण आशा पद्धतीने आयुष्यात येणारा बदल खुपच आनंददायक असतो. याचा अनुभव & जरा हटकेच्या निमित्ताने मी घेत आहे.

प्रश्न : भविष्यात तुला स्वतःला कुठे पहायला आवडेल?

– मनासारखं काम करावं आणि त्या कामातून समाधान मिळत जाईल, असं प्रत्येकालाच वाटत असतं. आपल्या पद्धतीने काम करत राहणे. आणि भविष्यात स्वतःला एक अभिनेत्री आणि लेखिकेच्या रुपात बघायला आवडेल…

धन्यवाद शिवानी. तुला भावी आयुष्यासाठी खुप खप शुभेच्छा.

-थॅंक यू सो मच..