अमेरिकेत पार पडलेल्या हनिवेलच्या 8 व्या वार्षिक ग्रीन बुट कॅम्पमध्ये पुण्यातील शिक्षिकेचा सहभाग

a

पुणे : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन डिआगो येथे पार पडलेल्या 8 व्या ग्रीन बुट कॅम्पमध्ये पुण्यातील विद्या व्हॅली स्कुलच्याशिक्षिका तेजश्री पाटील या १३ देशांतील ५० माध्यमिक शाळेतील शिक्षिकांमध्ये एकमेव भारतीय प्रतिनिधी होत्या. हनिवेल प्रायोजक असलेला ग्रीन बुट कॅम्प ही वार्षिक शाश्‍वत कार्यशाळा असून यामध्ये शिक्षकांना माहिती, अनुभव व संसाधनांचा पुरवठा करून ऊर्जा, सक्षमता व पर्यावरण या संकल्पना शिकविण्यासाठी मदत केली जाते. चार दिवस चाललेली ही कार्यशाळा जगभरात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित विषयांना पाठिंबा देण्याच्या हनिवेलच्या वचनबध्दतेचा एक भाग आहे.

कार्यशाळेची सुरूवात सॅन डिआगो गॅस अ‍ॅन्ड इलेक्ट्रिक (एसडीजीअ‍ॅन्डई) एनर्जी इनोव्हेशन सेंटरमधील पूर्ण दिवसीय सत्राने झाली. यामध्ये नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान, ग्रीन बिल्डींग मटेरियल व पर्यावरण शिक्षण तसेच नेतृत्व या विषयावर उर्जातज्ञांनी मार्गदर्शन केले . शाश्‍वत शिक्षणामुळे शिक्षकांना त्यांचे अनुभव वर्गात सांगण्याची संधी मिळतेच. परंतु याबरोबरच ही मुल्ये वास्तवात आणण्यासाठी व बदलघडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची संधी मिळत असल्याचे हनिवेल बिल्डिंग सोल्युशन्सचे अध्यक्ष जॉन राजचर्ट यांनीसांगितले. हनिवेल ग्रीन बुट कॅम्पद्वारे शिक्षकांना नवीकरणीय उर्जा व तंत्रज्ञानातील बदलाविषयी माहिती मिळते. ज्यामुळे ते त्यांच्या विद्यार्थ्यांनाभविष्यातील ग्रीन जॉब्ससाठी तयार करू शकतात.

यामध्ये सोलर हाऊस तयार करणे,व्हॅट मीटरच्यामदतीने उर्जावापर मोजणे व एनर्जी वॅम्पायर्सना ओळखणे,तसेच पाण्याचे नमुने गोळा करून तपासणे यांचा समावेश होता.कार्यशाळेच्या वेळीशिक्षकांनी इस्कॉनदीदो सिटी हॉलमध्ये रेन बॅरल्स शहरातील अग्निशमन दलाला देण्यासाठी तयार करण्यात आले. इस्कॉनदीदोच्या पॉकेट पार्कचे नूतनीकरण करण्यात आले व कंपोस्ट बॉक्स लावण्यात आले. या उपक्रमाबरोबरच शिक्षकांनी कल्पना कशा लागू कराव्यात व वर्गामध्ये त्यांच्याविषयाशी निगडीत शिक्षण कसे घ्यावे याविषयी चर्चा केली.

८ व्या वर्षातील ग्रीन बुट कॅम्प हनिवेल होम टाऊन सोल्युशन्सच्या सहयोगामुळे शक्य झाले आहे. हनिवेलचा कॉर्पोरेट सिटीझनशिप उपक्रम असून याद्वारे जगातील महत्त्वपूर्ण ५ विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात येते.यामध्ये विज्ञान व गणित शिक्षण, शाश्‍वत विकास, कौंटुबिक सुरक्षा वबचाव, हाउसिंग व शेल्टर तसेच ह्युमानिटेरियन रिलीफ यांचा समावेश आहे. तेजश्री यांच्या बरोबरच अमेरिका, कॅनडा, चीन, मेक्सिको, ब्राझील, रशिया, तुर्की, व्हिएतनाम, इंडोनेशिया, रोमानिया, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व फिलिपिन्स येथील शिक्षक सहभागी झाले होते.