‘मंगेशकर रुग्णालयाच्या ‘मिनी वॉकेथॉन’ला प्रतिसाद

mangeshkar

पुणे :  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे माई मंगेशकर कार्डियाक सेंटरच्या वतीने जागतिक हृदयदिनानिमित्त ‘मिनी वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शनिवारवाडा येथे सकाळी साडे सहा वाजता हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले.

‘वॉकेथॉन’चा मार्ग शनिवारवाडा ते दीनानाथ मंगेशकर रूग्णालय असा ४. ८ किलोमीटरचा होता. या ‘वॉकेथॉन’चे आयोजन प्रामुख्याने अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी केले होते. या वॉकेथॉनमध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेल्या २०० रुग्णांनी भाग घेतला. ‘ममिनी वॉकेथॉन’चे विजेते सुनीलकुमार देशमुख (प्रथम क्रमांक), योगेश चव्हाण (द्वीतीय), शेखर जोशी (तृतीय ) यांना अभय फिरोदिया, डॉ धनंजय केळकर, डॉ. शिरीष साठे, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले. सूर्यकांत लेले, गणेश थत्ते, मनोहर जोशी आणि बक्षी यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. घेई उंच भरारी या चंद्रशेखर जोशी लिखित पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांनी केले. हृदयशस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचे अनुभवांचा या पुस्तकात समावेश आहे.

मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले, हृदय शस्त्र क्रिया ही निरोगी आयुष्य जगण्याची दुसरी संधी असते. आयुष्यात आपण कारकीर्द ,पैसे , समाजसेवा अशा अनेक गोष्टींना प्राथमिकता देतो. मात्र, आपल्या शरीरालाही जपण्याची प्राथमिकता असली पाहिजे. हृदय शस्त्रक्रिया झाल्याने आयुष्य थांबत नाही, ते पुन्हा नव्याने सुरु होते. हृदय शस्त्रक्रिया झालेले रुग्ण एव्हरेस्ट शिखर ही सर करतात.

माई मंगेशकर कार्डियाक सेंटरफ चे विभाग प्रमुख डॉ.शिरीष साठे आणि वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. सतेज जानोरकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, हृदय ज्योत परिवाराच्या ज्योती मुंगसे, डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे, डॉ. आसावरी पागे उपस्थित होते. अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले.