‘कठिण परिस्थीतीमधील मुले’ या विषयावर पुण्यात परिषद संपन्न

d nagargoje

पुणे : बाल अधिकारावर कार्यरत अग्रेसर सेवाभावी संस्था प्लान इंडिया आणि अकॅडमी ऑफ गांधियन स्टडीज (एजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कठिण परिस्थितीमधील मुले या विषयावरील ५व्या विभागीय परिषदेमध्ये चार राज्यांसह (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा आणि गुजरात) पश्चिम भारतामधील असुरक्षित व वगळलेल्या मुलांच्या परिस्थितीवरील एकत्रित अहवाल मांडण्यात आला. ही दोन दिवसीय परिषद बाणेर येथील यशदा येथे पार पडली.

याप्रसंगी महिला व बालकल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, आयएएस डॉ. के. एम. नागरगोजे, प्लान इंडियाच्या प्रोग्राम स्टॅटेजी अँड पॉलिसीचे संचालक प्रदीप नारायणन, अकॅडमी ऑफ गांधियन स्टडीज (एजीएस)चे अध्यक्ष डॉ. जी. आर. एस. राव, प्लान इंडियाच्या पश्चिम विभागाचे सिनियर प्रोग्राम मॅनेजर सी. पी. अरूण आणि अकॅडमी ऑफ गांधियन स्टडीजचे सदस्य सचिव गोपालकृष्ण मुर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

पश्चिमी विभागीय चर्चेचा निष्कर्ष हा नवी दिल्ली येथे नोव्हेंबर २०१६ मध्ये होणार्‍या कठिण परिस्थितीमधील मुले या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा भाग असेल. ही परिषद भारतामधील बाल अधिकार संघटना, विकास व्यावसायिक, संशोधक आणि धोरण तयार करणार्‍यां मुलांना तोंड द्यावे लागत असलेल्या विविध अडचणी दुर करण्यासाठी तसेच अभ्यास, कार्यक्रम, धोरणे आणि गुंतवणूक यांद्वारे या अडचणी सोडविण्यासाठी अनोखी संधी देते. यासारख्याच चर्चा भारतामधील ४ राज्यांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये दक्षिण विभागीय परिषदेचा समावेश होता. जी विजयवाडा येथे आयोजित करण्यात आली होती, त्याप्रमाणेच उत्तरेकडील परिषद लखनऊ येथे, पूर्वेकडील परिषद कलकत्ता येथे आणि उत्तर-पूर्व भागातील परिषद गुवाहटी येथे आयोजित करण्यात आली होती.

कठिण परिस्थितीतील मुलांमध्ये रस्त्यावर किंवा कामाच्या ठिकाणी राहणारी मुले, एचआयव्ही/एड्सने ग्रस्त मुले, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली मुले, वेश्यांची मुले, बालमजुर यांचा समावेश असतो. लाखो मुले अन्न, घर, शिक्षण, वैद्यकीय निगा, संरक्षण आणि सुरक्षा यांसारख्या मुलभूत अधिकार व हक्कापासुन वंचित रहातात.