‘वजनदार’चे पोस्टर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित

wajndar

पुणे : दिवाळीचा सण आला की कुछ मिठा हो जाए म्हणत गोडाधोडावर मनसोक्त ताव मारला जातो. भरपूर फराळ केल्यानंतर शरीर वजनदार होतं आणि मग सुरू होते धावपळ… ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांचा वजनदार लुक असलेलं वजनदार या चित्रपटाचं चॉकलेटयुक्त पोस्टर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं. हा बहुचर्चित चित्रपट ११ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मलॅन्डमार्क फिल्म्सफच्या विधि कासलीवाल यांनी वजनदार या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर मराठीतल्या ग्लॅमरस आणि स्टार अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, तसेच चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि नव्या दमाचे फ्रेश चेहरे चेतन चिटणीस आणि चिराग पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उत्तम स्टारकास्ट, वेगळा विषय आणि फ्रेश लुक हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं. चित्रपटाचा अ‍ॅनिमेटेड लोगोही नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पोस्टरमधून चित्रपट वेगळा आणि फ्रेश असल्याचे संकेत मिळत आहेत. सई, प्रिया, सिद्धार्थ यांच्यासारखी दमदार स्टारकास्ट पोस्टरमधून येणार्‍या अंदाजामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.