प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा ‘इंफर्नो २०१६’ जल्लोषात

dhole patil

पुणे  : वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.त्यांच्या स्वागतासाठी ‘इंफर्नो २०१६’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे इतर वर्षांच्या विद्यार्थ्यांसोबत तेही महाविद्यालयात रुळावे या करीता हे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील, सेक्रेटरी उमा ढोले पाटील, संचालक ब्रिगेडिअर डॉ.भाटिया, प्राचार्य डॉ.सतीश आलमपल्लेवार, व्यवस्थापिका.प्रा.कांचन पुजारी, उपप्राचार्य अभिजीत दंडवते, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.सचिन राजस, प्रा.अनिल दरेकर उपस्थित होते.

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षातील कुलदीप बदाडीया, अभिजीत बडके, कौशल मालकर, हर्षल सपकाळे, अंशुमन कुमार, कुणाल वामने, विश्वजीत सुर्वे, चेतन गायकवाड, तेजस जगताप, डेनिस मेंझेस, रत्नदीप चक्रवर्ती, वसीम शेख, मृदुल जैन, कोमल कौर, झोहेल साखरपेकर, मनीष झा आदी विद्यार्थ्यानी परिश्रम घेत कार्यक्रमाचे संयोजन केले होते.