एसजीआय अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी मुलाखती संपन्न

Job-interview

कोल्हापुर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सव्हीसेस या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेतील विविध पदांसाठी मुलाखती संपन्न झाल्या. एसजीआयचे जनसंपर्क अधिकारी डिसूजा आणि एसजीआय अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे डायरेक्टर महेश थोरवे यांनी संस्थेच्या कॅम्पसमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

कोल्हापुर, सांगली, सातारा, पुणे येथून आलेल्या २० उमेदवारांनी शिक्षक, ऑफिस स्टाफ, मार्केटिंग आशा विविध पदांसाठी मुलाखतीसाठी हजेरी लावली होती. शेवटी अंतिम फेरीच्या मुलाखती संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी विनायक भोसले आणि महेश थोरवे यांनी घेतल्या. एक उमेदवार चक्क कोल्हापुरी चप्पल पायात घालून मुलाखतीसाठी आल्याने, कोल्हापुर हे कोल्हापुरींचे माहेरघर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.