जीएमएसी कडून असलेल्या एमबीए उमेदवारांसाठीचे एनएमएटी टेस्ट सेंटर आता पुण्यात

mba

पुणे : एमबीए उमेदवारांसाठी वाढत्या आवाक्यापर्यंत विस्तारीत करण्यासाठी, ग्रॅज्युएट मॅनेजमेन्ट ऍडमिशन काऊंसील, जीएमएसी एक्झाम कडून असलेल्या एनएमएटीच्या प्रशासकीय मंडळाने तीच्या पुणे येथील नवीन सेंटरची घोषणा केली. परीक्षेसाठीचे इतर सेंटर गुडगाव, जमशेदपुर, बडोदा आणि मॅनिपल येथे आहेत. जीएमएसी कडून असलेल्या एनएमएटीसाठीचे नोंदणीकरण ४ जुलै २०१६ पासुन चालू होईल आणि ३ ऑक्टोबरला समाप्त होईल.

७ऑक्टोबर पासून सुरूवात होऊन, उमेदवार २० डिसेंबर २०१६ पर्यंत परीक्षा देण्याचा प्रयत्न करू शकतील. या ७५ दिवसांच्या चक्रादरम्यान, ते भारतामधील २४ ठिकाणी असलेल्या ३२ सेंटरमध्ये त्यांना सोयीस्कर असलेल्या ठिकाणी तीनवेळा परीक्षा देण्याचे स्वातंत्र्य असेल.

एड्युसर्ग, पुणे हे नवीन टेस्ट सेंटर असुन त्याची सुरूवात उमेदवारांना जास्त प्रवास न करता व त्यांच्या तयारीवर संपुर्णपणे एकाग्र होऊन परीक्षा देता यावी यासाठी केलेली आहे. या विकासामुळे पुण्यातील युवा एमबीए व्यावसायीकांना केवळ त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याचीच प्रेरणा मिळणार नसुन त्यांना भारतामध्ये जीएमएसी ने आणलेल्या जगातील सर्वोत्तम प्रक्रियेचा अनुभव घेण्यास सुद्धा मदत होणार आहे. उमेदवारांची सोय वाढविण्यासाठी, जीएमएसी कडून असलेल्या एनएमएटी ने यावर्षी आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे ते म्हणजे मोबाईल मधुन लॉगइन व एकच साइन-इन प्रक्रिया.

जीएमएसीचे उत्पादन व्यवस्थापकचे संचालक विक्रम शाह म्हणाले, जीएमएसी नेहमीच उमेदवारांची सुलभता आणि बुद्धीमत्ता व महत्वाकांक्षा यांना जोडण्याची योग्य संधी यांसाठीच कार्य करत आली आहे. भारतामध्ये बुद्धीमत्तेची उभारणी करण्याच्या आमच्या वचनबद्धतेसह हे नवीन टेस्ट सेंटर चालू करण्यात येत आहेत. यामुळे भरपुर पदवीपूर्व विद्यार्थ्यांना जीएमएसी कडून असलेल्या एनएमएटी परीक्षेसाठीसाठी बसता येणार आहे यासाठी आम्ही फारच उत्साही व सकारात्मक आहोत जे आता भारतामधील अग्रेसर व्यवस्थापकीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारलेले मूल्यांकन आहे.