‘फॅमिली कट्टा’ ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रासह परदेशातही होतोय रिलीज

Family-Katta-2016-Marathi-Movie

पुणे : वंदना गुप्ते यांची निर्मिती असलेला व संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा ‘फॅमिली कट्टा’ हा मराठी चित्रपट येत्या ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रासह परदेशातही रिलीज होत आहे. गेली ४४ वर्षे या क्षेत्रात घालविल्यावर आता निर्मितीमध्ये उतरलेल्या वंदनाताईंच्या या पहिल्या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे.

वंदना गुप्ते यांनी १९७१ साली ‘पद्मश्री धुंडिराज’ या नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४ दशके त्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक नाटके गाजविली आहेत. ‘गगनभेदी’, ‘रमले मी’, ‘रंग उमलत्या मनाचे’, ‘अखेरचा सवाल’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘झुंज’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘संध्याछाया’ अशा अनेक वैविध्यपूर्ण नाटकांमधून त्यांनी अविस्मरणीय भूमिका केलेल्या आहेत. त्यांना यासाठी अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलेले आहे. अनेक मालिका व चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिकाही अशाच गाजलेल्या आहेत. वयाच्या ७ व्या वर्षापासून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या ‘गीत गोपाळ’ या कार्यक्रमातून प्रथम रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर त्यांनी अनेक नामवंत गायकांसोबत गाण्याचे कार्यक्रम सादर केले. हे राष्ट्र देवतांचे, पप्पा सांगा कुणाचे, गा गीत तू सतारी, मीरा तुला आळवीते, तुला आळविता जीवन स्वराचे, संपले स्वप्न हे अशा अनेक सुरेल लोकप्रिय गाण्यातून त्या रसिकांमध्ये लोकप्रिय झाल्या.

‘सप्तक’ या त्यांच्या ऑर्केस्ट्राचे देश-परदेशात अनेक दौरे करून त्यांनी लोकांना आपल्या मधुर स्वरांनी मंत्रमुग्ध केले. केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर त्यांनी ‘पहिल्या महिला ध्वनिमुद्रक’ म्हणूनही मान मिळावला आहे. सप्तक हा आपला रेकॉर्ड स्टुडिओ चालवताना त्यांना व्यवस्थापन आणि प्रशासन या गोष्टींची गोडी लागली आणि आता निर्मितीच्या क्षेत्रात ती कामी येत आहे. महाराष्ट्रच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा आणि प्रभात कंपनीपासून चित्रपट क्षेत्रात असलेले गीतकार, संवाद लेखक, शायर अमर वर्मा यांच्या या दोन कन्या आज अभिमानाने व आत्मविश्वासाने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. कलाक्षेत्राशी काही दशकांचा संबंध असलेल्या या दोघींना ‘फॅमिली कट्टा’विषयी आता कमालीची उत्सुकता आहे.

वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, प्रतिक्षा लोणकर, किरण करमरकर, सुलेखा तळवलकर, सचिन देशपांडे, सई तामदिवंगत संगीतकार आदेश श्रीवास्तव, ्हणकर, संजय खापरे, गौरी नलावडे, आलोक राजवाडे या कलाकारांच्या सिनेमात प्रमुख्य भूमिका आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचं लेखन प्रशांत दळवी यांनी केल आहे. तर सिनेमाची सिनेमटोग्राफी महेश लिमये यांनी केली. तर सिनेमाचं संगीत-पार्श्वसंगीत हे मंगेश धाकडे यांनी आणि गीते लिहिली आहेत दासू वैद्य यांनी.