पुण्यात ‘तोहफा- ए – गज़ल’चे ८ ऑक्टोबर रोजी आयोजन

urdu-hindi-shayari-ghazal

पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये उर्दू भाषेच्या दर्दींची संख्या कमी नाही. खासकरून उर्दूचे खास आकर्षण असलेल्या गजल आणि शेर-ओ-शायरींच्या रसिकांची संख्या मोठी आहे. उर्दू भाषेची आपली एक नजाकत आहे, प्रेम आणि विरह यांसारख्या भावना व्यक्त करण्याची या भाषेची क्षमता अजोड आहे. या रसिकांना उर्दू गजलांचा आनंद मिळविण्याची संधी मिळणार असुन येत्या ८ ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, भवानी पेठ येथे होणार आहे.

डॉ. शशिकला शिरगोपीकर, गायत्री सप्रे-ढवळे, श्रुती करंदीकर व कुमार करंदीकर यांसारख्या कलाकारांनी साज पुणे च्या यशात हातभार लावला आहे. इश्क नहीं आसान, दूर है मंजिल, तसव्वूर, गुलों में रंग भरे, दिल की बात असे अनेक कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत सादर केले असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांमुळे ते लोकप्रिय झाले आहेत. सध्या ‘साज’चा ‘गालिब से फैज’तक हा कार्यक्रम अत्यंत गाजतोय व उर्दू गजलप्रेमींचे लक्ष वेधून घेतोय. साज निर्मित व इसहाक जाफर प्रायोजित व प्रस्तुत तोहफा- ए -गज़ल हा नवीन कार्यक्रम येत्या शनिवारी, ८ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता सादर होणार आहे.

उस्ताद मेहंदी हसन, बेगम अख्तर साहिबा, आबिदा परवीन, फरीदा खानम, जगजीत-चित्रा सिंग या कलाकारांनी गायलेल्या लोकप्रिय गजला या कार्यक्रमात पेश करण्यात येणार आहेत. या शिवाय काही नवीन रचनाही सादर केले जातील. डॉ. शशिकला शिरगोपीकर, गायत्री सप्रे-ढवळे, श्रुती करंदीकर व कुमार करंदीकर या गजला गाणार आहेत. निवेदन डॉ. सुनील केशव देवधर यांचे असेल तर तबला साथ अरुण गवई यांची असेल.