पुण्यातील पोस्टमन मंडळींच्या हस्ते ‘पुण्यभूषण ‘ दिवाळी अंकाचे प्रकाशन !

punybhushn

पुणे : पुणे शहराला वाहिलेला एकमेव दिवाळी अंक अशी ख्याती असलेल्या ‘पुण्यभूषण ‘ या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी दुपारी अडीच वाजता सिटी पोस्ट ऑफिस (बेलबाग चौक ) येथे पोस्टमन मंडळींच्या हस्ते झाले.

दिवाळी शुभेच्छा पत्रे आणि अंक पोहोचविणाऱ्या पोस्टमन मंडळींना प्रथमच ‘पुण्यभूषण ‘ दिवाळी अंक प्रकाशनाचा मान मिळाला. याचवेळी ‘पुण्यभूषण ‘दिवाळी अंक विशेष भेट स्वरूपात देण्याच्या ‘अक्षर मिठाई ‘ या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला . डॉ सतीश देसाई यांनी ही अक्षर मिठाई सिटी पोस्ट ऑफिस चे वरिष्ठ पोस्ट मास्तर के . आर . कोरडे याना दिली ,आणि योजनेचा प्रारंभ झाला . ‘सुदृढ समाजासाठी सुदृढ ,सकस वाचन हवे आणि दिवाळीत ‘अक्षर मिठाई ‘ ची भेट दिली जावी,’ अशी या योजनेची संकल्पना असल्याचे मकरंद टिल्लू यांनी सांगितले .त्यासाठी विशेष भेट पाकीट तयार करण्यात आले आहे .

‘पुण्यातील अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर पुणे शहराला वाहिलेला दिवाळी अंक ही संकल्पना पुढे आली . आणि जगभर पुणेकर तसेच मराठी वाचकांनी त्याला प्रतिसाद दिला ‘ असे डॉ . सतीश देसाई यांनी यावेळी सांगितले .

लता रमेश पन्हाळे ,रविराज विष्णू सुभेदार ,विष्णू वामन गुंजाळ ,विलास सोमनाथ एडके ,रुपाली नामदेव लांडे ,श्रद्धा विजय जंगम ,सुभाष रामचंद्र काकडे ,गौरी राहिंज ,एम एल पवार या पोस्टमन मंडळींना आज दिवाळी अंक प्रकाशनाचा मान मिळाला.

पुण्यभूषण फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ सतीश देसाई ,सिटी पोस्ट ऑफिस चे वरिष्ठ पोस्ट मास्तर के. आर. कोरडे, आर. के. देवकर, प्राची बर्वे हा अधिकारी वर्ग तसेच मकरंद टिल्लू, नितीन ढेपे, दिलीप कुंभोजकर, रश्मी कुलकर्णी, वरूण पालकर, मिलिंद बर्वे, अतुल गवळी, प्रदीप पानघंटी हे ‘पुण्यभूषण ‘टीम चे सदस्य उपस्थित होते .