एमडीसी एंटरटेन्मेंट कंपनी तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

cha

पुणे : पुण्यातील एमडीसी एंटरटेन्मेंट कंपनी तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  नरक चतुर्दशीच्या मुहुर्तावर शनिवार, 29 ऑक्टोबर रोजी आयएलएस लॉ कॉलेज येथे सकाळी 6 ते 8 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन,पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतुरवादन याबरोबरच पंडित भवानी शंकर हे पखवाज आणि पंडित योगेश समसी यांच्या तबला वादनाचाही आनंद रसिकांना अनुभवता येणार आहे.तसेच याप्रसंगी मॉर्निंग रागा व संगीत जुगलबंदी अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

सर्वांना परवडतील अशा तिकिटदरात या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. ऑनलाईन बुकिंगच्या अधिक माहितीसाठी https://mdcfestival.com/book-now/ ,बुकमायशो तसेच एमडीसीच्या फेसबुक पेजवर भेट द्यावी.