पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे ‘सर्वधर्मिय आणि कृतज्ञ दिवाळी’ साजरी

madhym

पुणे : ‘प्रबोधन माध्यम’ या संस्थेतर्फे ‘सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी’ या उपक्रमाचे यावर्षी ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ (केडगाव, ता. दौंड) येथे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते. बुधवारी दिवाळीच्या ‘वसूबारस’ या पहिल्या दिवशी हा उपक्रम केडगाव, तालुका दौंड येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ मधील सातशे अनाथ मुले , द्र्ष्टी हीन व वृद्ध महिला व बालकांसमवेत समवेत साजरा झाला.

‘प्रबोधन माध्यम’चे संस्थापक दीपक बिडकर, संचालक गौरी बिडकर, मिशनचे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख, सारीका रोजेकर, सचिन सुर्यवंशी यांच्या हस्ते महिलांना व अनाथ मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रबोधन माध्यम संस्थेच्या वतीने ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ च्या अन्न कोठाराला मदत म्हणून शंभर किलो धान्य देण्यात आले.

पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष, पी.ए.इनामदार, मिशनचे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख, प्रबोधन माध्यमचे संस्थापक दीपक बिडकर, संचालक गौरी बिडकर,मिशन चे संचालक लॉरेन फ्रान्सिस , उप संचालक अनिल फ्रान्सिस , मुख्याध्यापिका प्रमिला डोंगरे , सारीका रोजेकर, सचिन सुर्यवंशी उपस्थित होते.

दिवाळी हा आनंदाचा कृतज्ञतेचा सण आहे. त्यात सर्व धर्मियांना, सर्व समाज घटकांना सहभागी करून घ्यावे या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन सलग पाच वर्षापासून केले जात आहे. या उपक्रमातंर्गत आत्तापर्यंत गरीब, अनाथ विद्यार्थी, कचरावेचक, काश्मीरमधील विद्यार्थी, मदरसामधील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, बॅक स्टेज आर्टीस्ट, सामाजिक कार्यकर्ते आदी समाजातील विविध घटक सहभागी झाले आहेत.

‘सर्वधर्मिय आणि कृतज्ञ दिवाळी’ उपक्रमाच्या 5 वर्षाचा आढावा
पहिले वर्ष : अनाथ-वंचित व अंध विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, काश्मीरमधील मुले, कचरावेचक महिला अशा वंचित लोकांसमवेत तसेच या कार्यक्रमाला महापौर, मोहनसिंग राजपाल, सर्वधर्मीय धर्मगुरू, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’ ची स्वयंसेवी संस्था असलेल्या ‘जनवाणी’ या संस्थेच्या संचालिका किशोरी गद्रे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे, उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, ‘भारत विकास ग्रुप इंडिया’चे (बी.व्ही.जी) संस्थापक एच. आर.गायकवाड, डॉ. कुमार सप्तर्षी, काश्मिरमधील मुलांसाठी काम करणार्‍या आसीम फाउंडेशनचे सारंग गोसावी तसेच अनेक क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.

दुसरे वर्ष : गरीब, अनाथ, अंध, कचरावेचक, काश्मीरमधील विद्यार्थी, मदरसामधील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमवेत मंदार पाठक (गुरुजी), फादर अनिल चक्र नारायण, भन्ते वंशपाल, मौलाना नजमुद्दीन, मौलाना इरफान शेख तसेच शीख धर्मगुरू श्री. सिंग असे सर्वधर्मीय धर्मगुरू , महापौर वैशाली बनकर, राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे राज्य समन्वयक लतिफ मगदूम, अन्वर राजन, सुनील बनकर, काश्मीरमध्ये काम करणार्‍या ‘असीम फौंडेशन’ चे सारंग गोसावी ,‘युक्रांद’ चे कार्यवाह संदीप बर्वे ,‘शाळा’ चित्रपटाचे निर्माते निलेश नवलाखा, ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ संस्थेच्या अध्यक्ष गीतांजली देगावकर, नसीर खान, पुणे पत्रकार प्रतिष्ठान’चे अध्यक्ष उमेश घोंगडे, ‘वेदांत श्री’ दिवाळी अंकाचे संपादक सुनील गायकवाड, नितीन मेमाणे, जवाहर बाहेती (अध्यक्ष महेश सेवा संघ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तिसरे वर्ष : सर्वधर्मीय धर्मगुरू, गरीब, अनाथ विद्यार्थी, कचरावेचक, काश्मीरमधील विद्यार्थी, मदरसामधील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, बॅक स्टेज आर्टीस्ट, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमवेत ‘अस्तित्व प्रतिष्ठान गुरूकूल’मधील 100 मुलांनी दीपोत्सव साजरा केला. ‘पत्रकार संघा’चे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, ‘रंगभूमी सेवक संघा’चे अध्यक्ष सुरेंद्र गोखले, चित्रपट निर्माते निलेश नवलाखा, ‘असीम फाऊंडेशन’च्या सई बर्वे, ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ संस्थेच्या अध्यक्ष गीतांजली देगावकर, जवाहर बाहेती (महेश सेवा संघ), रवी चौधरी, गायत्री चौधरी आदी उपस्थित होते.

चौथे वर्ष : अस्तित्व प्रतिष्ठान गुरूकूल (वीर) ता. पुरंदर येथे सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी साजरी करण्यात आली. पुण्यात होणारा हा उपक्रम यावर्षी ग्रामीण भागातील 50 निवासी विद्यार्थ्यांच्या गुरूकूलमध्ये घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कपडे, धान्य, खाऊ देण्यात आला.

 पाचवे वर्ष : या वर्षी तैय्यबिया अनाथगृहात (पुणे कॅम्प) येथे सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळीचे आयोजन करण्यात आले. तय्यबिया अनाथ गृह या 1909 साली स्थापन झालेल्या या अनाथ गृहात प्रथमच दिवाळी साजरी करण्यात आली. येथील 150 विद्यार्थ्यांसमवेत हा उपक्रम साजरा झाला.