वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद मनापासून घ्यावा : डॉ. मुजूमदार

mujumdar

पुणे : विविध देशांना भेटी देताना त्या त्या भागातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थाचा आस्वाद मनापासून घेतला पाहिजे.त्यामुळे आपोआपच संस्कृतीची ओळख होत राहाते असे जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ शां.ब.मुजुमदार यांनी सांगितले. बुकगंगा पब्लिकेशन्स तर्फे अनिल नेने लिखित खावे त्याच्या देशा आणि मनोगत या पुस्तकांच्या दुसर्‍या ​आवृत्तीचे ​​ आणि ​ई -आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.वीणा देव, लेखक अनिल नेने, डॉ.आश्‍विनी नेने, विजय देव, बुकगंगाचे संस्थापक मंदार जोगळेकर उपस्थित होते. नेने यांची नातवंडे लारा व थियो डॉड यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

नेने यांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना आपल्यातील कवी मनाला जागा करून दिली.त्याचे रूपांतर,प्रतिबिंब मनोगत पुस्तकात उमटले आहे . त्यांच्या कविता या भावनाप्रधान आणि संवेदनशील आहेत,असे ते म्हणाले .

डॉ देव यांनी नेने यांच्या बाबतच्या आठवणी सांगितल्या. नेने यांनी पाक सिद्धीतील बारकावे शोधले, नवीन पदार्थाची चव अनुभवली. त्याच्या लेखनात अभ्यासू वृत्ती जाणवते. हा त्यांचा खाद्यानुभव लेखनातून वाचकापर्यंत पोचवला आहे.

नेने​ यांना सुत्रसंचालिका ममता क्षेमकल्याणी यांनी मुुलाखतीच्या माध्यमातून बोलके केले. जोगळेकर यांनी बुकगंगाची सुरुवातीपासूनची माहिती कथन केली. नजीकच्या काळात ऑडिओ दिवाळी अंक प्रकाशित करणार असल्याचे त्यांनी संगितले. सुप्रिया लिमये यांनी आभार मानले .