महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून फराळ साहित्याचे वाटप

mns

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, मनविसे व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रमेश परदेशी यांच्या संकल्पनेतून व हर्षल गांधी यांच्या सहकार्याने पुण्यामधील भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथील कर्मचारी वर्गाला म्हणजेच सेटींग दादा, लाईट दादा, स्पॉट दादा, दरवान दादा ई. ह्यांच्या 50 पेक्षा अधिक कुटुंबांना दिपावली शिदोरी (फराळाचे साहित्य व उटणे, पणत्या, सुगंधी तेल ई.) चे वाटप करण्यात आले.

ह्या कार्यक्रमास साथ लाभली ती अभिजीत खांडकेकर, विजय पटवर्धन, शाश्वती पिंपळीकर, श्रुती मराठे, शिवानी रांगोळे, प्रदीप वैद्य, सीए चेतन शास्त्री व मंदार बलकवडे, ह्यांची.

या कार्यक्रमास अजय शिंदे, सुधीर धावडे, अमित रानडे, चेतन धोत्रे, आनंद कुंदूर, रोहित गोडबोले व प्रज्ञा दंडवते यांची उपस्थिती होती.