​पिरंगुट येथे अद्ययावत नेचर क्युअर अ‍ॅण्ड योगा सेंटरची स्थापना

pirngut

पुणे : निसर्गोपचार व योगाच्या मदतीने विविध आजारांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत ​ओमकार ​​नेचर क्युअर अ‍ॅण्ड योगा सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. सेंटरची स्थापना निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. जया पेंडसे तसेच दादर येथील प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. कुमोद जोशी यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.

सेंटर विषयी माहिती देताना डॉ. जया पेंडसे म्हणाल्या की, पिरंगुटच्या निसर्गसानिध्यात हे निसर्गोपचार केंद्र पुणेकरांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी रुजू होत आहे. अद्ययावत सुविधा तसेच​ निसर्गोपचाराच्या माध्यमातून येथे ब्लड प्रेशर, डायबिटीज, सोरायसिस, त्वचा विकारांसारख्या अनेक आजारांवर उपचार केले जातील. उपचारपद्धतींमध्ये योगा मेडिसिन, एनिमा, भूगर्भस्नान, वॉटरबाथ,​ वमन, कॅल्शियम बाथ आदींचा समावेश आहे. ​तसेच विविध आजारांसाठी पंचमहाभूतांचा उपयोग करून​ ​उपचार करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या सेंटरच्या स्थापनेमध्ये अजित करंदीकर यांचे सहकार्य लाभल्याचे त्या म्हणाल्या.

याविषयी बोलताना डॉ. कुमोद जोशी म्हणाल्या की, ​निसर्गोपचार पद्धतींमुळे अनेक आजार बरे होऊ शकतात, याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. नाविन्यपूर्ण सुविधांनी सज्ज असलेले नेचर क्युअर अ‍ॅण्ड योगा सेंटर ​निसर्गोपचाराच्या प्रचार-प्रसाराला नक्कीच पुढे नेईल. येथे पाच दिवसीय, तीन दिवसीय निवासी पद्धतीच्या विविध उपचारांनी ब्लड प्रेशर, डायबिटीज, सोरायसिस, त्वचा विकारांसारख्या अनेक आजारांवर ​ ​प्रति​बंध ​तसेच उपचार करण्यात येतील. वजन कमी करणे किंवा वाढविण्यासाठी देखील निसर्गोपचार पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. नेचर क्युअर अ‍ॅण्ड योगा सेंटरचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

नेचर क्युअर अ‍ॅण्ड योगा सेंटरची पहिली बॅच ११ नोव्हेंबर २०१६ पासून सुरु होत असून येथे त्यानंतर पाच दिवसीय, तीन दिवसीय निवासी शिबिरांच्या माध्यमातून नियमित उपचार देण्यात येणार आहेत. ​सेंटरविषयी अधिक माहिती करिता डॉ. जया पेंडसे- ९८५०५२३२९० तसेच डॉ. कुमोद जोशी- ९८२१७५७०३९ यांच्याशी संपर्क साधावा. ​