नवी बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मो भारतात दाखल

bmw

पुणेः नवी बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मो भारतात दाखल करण्यात आली. बीएमडब्लू प्लाण्ट चेन्नई येथे उत्पादित करण्यात आलेली, नवी बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मो आजपासून भारतभरातील सर्व बीएमडब्लू डिलरशिप्स येथे डिझेल व पेट्रोल व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे.

बीएमडब्लू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष(कार्यकारी), फ्रँक श्‍लोडर म्हणाले, बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मोने सेगमेण्टमध्ये नवीन वाहन संकल्पना स्थापित केली आणि तिच्या अनोख्या व आधुनिक वैशिष्ट्यांसह इनोव्हेटर बनला. नवीन बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मो अधिक अत्याधुनिक रुपात लक्झरी-क्लास, आकर्षकता, स्पोर्टीनेस आणि एैसपैस जागा यांची सुरेख सुविधा प्रदान करते. नवीन बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मोमध्ये उत्तम गतिशीलता व एैसपैस जागेचे संयोजन समाविष्ट आहे. कार सौंदर्य व आकर्षकपणाचे संयोजन समाविष्ट आहे.

नवी बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मो दोन विशेष डिझाइन स्किम्समध्ये उपलब्ध आहे – स्पोर्ट् लाइन व लक्झरी लाइन. स्पोर्ट् लाइन आकर्षक स्टाइलिंग व इंटेरियर्ससह अनोखेपणा प्रकट करते, तर लक्झरी लाइन आकर्षक रचना व सर्व सुविधांनी युक्त अशा वैशिष्ट्यांसह तुम्हाला तुमची स्टायलिश बाजू दर्शविण्याकरिता प्रवृत्त करते.

नवी बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मोचे एक्स्टेरियर अधिक डायनॅमिक व आकर्षक आहे. वैशिष्ट्यपूर्ण नवी बीएमडब्लू प्रमाणे, फ्रेमलेस खिडक्यांसह चार दरवाजे, कूपे-स्टाइल, काहीसे झुकावदार छत आणि आपोआपपणे चालू-बंद होणारे टेलगेट हे बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मोची वैशिष्ट्यपूर्ण एक्स्टेरियर वैशिष्ट्ये आहेत. तसेच एल-आकारामधील दिवे वाहनाच्या व्यापक आकाराला साजेसे असे आहेत.

नवीन डिझाइन करण्यात आलेले एलइडी हेडलाइट्ससोबत एलइडी रिअर लाइट्स नवी बीएमडब्लू 3 सीरीज ग्रॅन टूरिझ्मोच्या स्टायलिश आकर्षकतेमध्ये अधिक भर करतात. ऑटोमॅटिक हाइट अ‍ॅक्टिवेशनसह अ‍ॅडप्टीव्ह एलइडी हेडलाइट्स आणि चार ’दुधी’ रंगामधील एलइडी कोरोना रिंग डिझाइन कारला स्पोर्टिअर लुक प्रदान करते. इंटेलिजण्ट लाइट सिस्टममध्ये अ‍ॅडप्टीव्ह कॉर्नरिंग लाइट्स आणि हाय-बीम असिस्टण्ट सिस्टमचा सुद्धा समावेश आहे, जे सर्व परिस्थितींमध्ये रस्त्यावर प्रखर प्रकाश प्रदान करतात.

असे आहेत एक्स-शोरुम प्राईसेस
नवी बीएमडब्लू 320डी ग्रॅन टूरिझ्मो स्पोर्ट् लाइन (आयएनआर 4,330,000)
नवी बीएमडब्लू 320डी ग्रॅन टूरिझ्मो लक्झरी लाइन (आयएनआर 4,650,000)
नवी बीएमडब्लू 330आय ग्रॅन टूरिझ्मो लक्झरी लाइन (आयएनआर 4,750,000)