मॅक्स म्युलर भवन तर्फे अनोखा व्हिडिओ मॅपिंग उपक्रम

shnivar

पुणे : मॅक्स म्युलर भवन पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 27 व 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता ​​शनिवारवाडा येथे अनोख्या व्हिडिओ मॅपिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आकर्षक विद्युत रोषणाईची कमाल पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. या शोसाठी जगप्रसिध्द लाईट आर्टिस्ट फिलीप गाईस्ट पुण्यात येणार आहे.

याप्रसंगी विद्युत रोषणाईला डीजेन मा फैजा संगीताने साथ देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे, अशी माहिती ग्योथं इन्स्टिट्युट मॅक्स् म्युलर भवन पुणेच्या संचालिका हायडी वेटझ् कुबाक व कल्चरल कॉर्डिनेटर रेणू जामगावकर यांनी दिली.

फिलिप गाईस्ट याने ब्राझिल, सेनेगल, इराण आणि इतर देशांमध्ये याआधी अनेक नामवंत इमारती आणि ऐतिहासिक स्मारकांवर आकर्षक रोषणाई केली आहे. या व्हिडिओ मॅपिंग प्रकल्पाचे मुख्य उद्देश्य सार्वजनिक ठिकाणे ही सांस्कृतिक ठिकाणे असतात याबाबत जागरूकता व्हावी व शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक वारसा याबाबत जागरूकता निर्माण करणे आहे.