अँकर इलेक्ट्रिकल्सतर्फे हरिद्वार, उत्तराखंडमध्ये 150 कोटी रुपयांची गुंतवणूक;

harvar

पुणे : पॅनासोनिक कॉर्पोरेशनची पूर्णतः मालकीची उपकंपनी, अँकर इलेक्ट्रिकल्सने आज भारतातील हरिद्वार येथील त्यांच्या नवीन उत्पादन केंद्रामधील कार्यसंचालनाच्या प्रारंभाची घोषणा केली. 150 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह हा नवीन उत्पादन केंद्र उभारण्यात आला आहे. दरवर्षी 25 दशलक्ष युनिट्स निर्माण करण्याची केंद्राची उत्पादन क्षमता असेल आणि आर्थिक वर्ष 2020 पर्यंत क्षमता दुप्पट करण्याचा कंपनीचा मनसुबा आहे. नुकतेच उभारण्यात आलेले उत्पादन केंद्र वाढत्या गरजांची पूर्तता करण्याकरिता वायरिंग डिवाईसेस व स्विचगिअरच्या परिपूर्ण रेंजसह इतर डिवाईसेसची निर्मिती करेल.

उत्पादन केंद्र 25,000 चौ.मी.हून अधिक जागेवर विस्तृत पसरलेले आहे आणि हे केंद्र अँकरचे भारतातील दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे. कार्बन डायऑक्साईडमध्ये घट करण्याशी कटिबद्ध असलेला, पर्यावरण अनुकूल केंद्र पॅनासोनिकच्या हरित नाविन्यतेमधील नेतृत्वाला वर्धित करतो आणि एलईडी दिव्यांच्या इन्स्टॉलेशनसारखी अनेक हरित वैशिष्ट्ये व प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर यांचा अवलंब केला आहे.

पॅनासोनिक इंडिया व साऊथ एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष शर्मा म्हणाले, ‘‘अँकर हा पॅनासोनिक इंडियासाठी धोरणात्मक व्यवसाय युनिट आहे, जो सुरक्षित, विश्‍वसनीय व दर्जात्मक इलेक्ट्रिकल उत्पादने प्रदान करण्यार्‍या आमच्या कटिबद्धतेला विस्तारित करतो. हरिद्वार येथील नवीन केंद्राचे उद्घाटन हे याच कटिबद्धतेचा एक भाग आहे. नवीन केंद्र घर व व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम एनर्जी सोल्यूशन्स प्रदान करते. 150 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीने स्थानिक उत्पादनाला चालना दिली आहे, शिवाय ते सरकारचा ‘मेक इन इंडिया’ दृष्टीकोनाशी निगडित आहे. याव्यतिरिक्त, नवीन केंद्र अँकरच्या वाढत्या व्यवसायामध्ये अधिक भर करेल, ज्यामुळे दुप्पट विकास होण्यासोबतच 2018पर्यंत भारतातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स कंपनी बनण्याच्या हेतूला चालना मिळेल.’’

अँकर इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक मित्सुरु शिरासवा म्हणाले, ‘‘भारतीय ग्राहकांनी आमच्यावर दर्शविलेला विश्‍वास पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. हरिद्वारमधील नवीन उत्पादन केंद्र हे आमच्या व्यवसाय धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि आम्ही आमचा विस्तार करणे सुरुच ठेवू. नवीन केंद्र आमच्या ग्राहकांना त्यांच्या पैशाचे मोल, सुलभ उपलब्धता, समर्थनात्मक विक्री-पश्‍चात्त सेवा, समकालीन व तांत्रिक उच्च दर्जाची इलेक्ट्रिकल उत्पादने प्रदान करेल आणि केंद्राचा ग्राहकांना आरामदायी सुविधा व ऊर्जा बचत प्रदान करण्याचा हेतू आहे. उत्पादन क्षमता वाढविण्याच्या हेतूने दाखल करण्यात आलेल्या या केंद्रासह, आम्ही 2020पर्यंत प्रतिवर्ष 600 मिलियन पीसेस व 20 मिलियन स्विचगिअर पोल्स निर्माण करण्यामध्ये सक्षम होऊ. सध्या, आम्ही उत्पादनासाठी 60 टक्के क्षमताचा वापर करणार आहोत आणि आम्ही भावी काळात ऑटोमॅटिक असेम्बली स्थापित करण्याची योजना आखत आहोत.’’