“सर्जिकल स्ट्राईक”वर आधारित “विडा एक संघर्ष” ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

vida

“विडा एक संघर्ष” हा सर्जिकल स्ट्राईक आणी सामाजिक आशयावर आधारीत मराठी चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर ला प्रदर्शित होत आहे. आपल्या पोटाची भूक भागवणाऱ्या शेतकरी वर्ग, तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या आयुष्यावर आधारीत हा चिञपट मातब्बर सहकलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे .

दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकरी वर्गावर निसर्गाने जो कोप केला आहे. त्यातून त्यांना बाहेर निघण्याचा मार्गच दिसेना. या शेतकरी वर्गाची बिकट परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती हर्षश्री फिल्म्स प्रोडक्शन हाऊसने केली असून या प्रोडक्शन हाऊसच्या निर्मिताने चित्रपटाच्या एकूण कमाईच्या ६० टक्के रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना आणी विरगती प्राप्त सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

प्रमुख भूमिकेत असलेला नायक अनील माळी यांनी लष्करात सेवा बजावली असून 1999 कारगिल युद्धात जो अनुभव आला तो कश्या पध्दतीने पडद्यावर साकारला आहे. हया चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदे यांचे आहे. शुभांगी लाटकर, आनंत जोग, यतिन कार्यकर, बबनराव घोलप, प्रतीक्षा, मेघा यांनीही चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. नवीन मोरे यांचे संगीत असून विक्रम लाड यांनी नृत्य दिग्दर्शनाचे काम केले आहे.