रणवीरने स्विकारली स्विझरलँडसाठीची ब्रॅंड ऍंबेसेडरशीप

ranvir

पुणे : रणवीर सिंग प्रेमात पडला आहे….स्विझरलँडच्या! अनेक भारतीयांच्या सर्वात लाडक्या असलेल्या अभिनेत्याने नुकतीच या सुंदर देशाला भेट दिली आणि तो चक्क त्याच्या प्रेमात पडला. स्विझरलँड पर्यटनाचा ब्रॅंड एँबेसेडरच्या स्वरुपामध्ये पहिला भारतीय म्हणून त्याचे नाव घेतले जात आहे.

रणवीरने नुकत्याच झालेल्या आपल्या स्विझरलँडवारीमध्ये अनेक प्रकारच्या अनुभवांचा आनंद लुटला, आता तो २०१७च्या स्विझरलँड टूरिजमच्या नेचर वाँट्स यू बॅक कँपेनला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा इन-चार्ज/प्रभारी बनणार आहे. आपल्या धडाकेबाज आणि धाडसी स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या रणवीरने या जोशपूर्ण अनुभवासाठी स्विझरलँडमध्ये एकामागोमाग अनेक कृतींची जणूकाही श्रृंखला पार पाडली. झुरीक लेकवर वेकबोर्डिंग करण्यापासून ते ल्युकेममधल्या स्विस म्युझियम ऑफ ट्रान्सपोर्टमधल्या स्की जंप्सपर्यंत आणि माऊंट पिलॅटसमधल्या पॅराग्लायडिंगपासून ते इंटरलाकेनमधल्या स्कायडायव्हिंगपर्यंत त्याने सर्व धाडसे स्वत: केली आहेत. परंतु ही सर्व धाडसे त्याच्या सुट्टीतला थराराचा एक भाग होती. रणवीरला चॉकलेट्स खूप आवडत असल्याने त्याने इंटरलाकेनमधल्या एका मजेशीर चॉकलेट क्लबला चॉकलेट बनवण्यासाठी भेट दिली. फुटबॉलचा हाडाचा चाहता असलेल्या रणवीरने झुरीकमधल्या फिफा वर्ल्ड म्युझियमला देखील भेट दिली आणि व्हिक्टोरिया युंगफ्राऊमधल्या यश चोप्रा सुईटला आणि कुरसाल गार्डनमधल्या यश चोप्रांच्या पुतळ्याला भेट देऊन यश चोप्रा यांना श्रध्दांजली दिली.

थोडक्यात सांगायचे म्हणजे रणवीरने स्विझरलँडची आपली पहिली सफर अत्यंत उत्साहात पार पाडली आणि आता तो प्रत्येकाला त्याचे गुणविशेष माहित करुन देण्यासाठी अधीर झाला आहे.

रणवीर सिंग म्हणाला, “स्विझरलँड आपल्या नीटनेटकेपणा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे, पण मला ज्या गोष्टीचे सर्वाधिक आश्चर्य वाटले ते म्हणजे मी भेट देण्याच्या वेळी स्टोअरमध्ये असलेली ऍडवेंचर्स. स्विझरलँडला जाणे हे माझे स्वप्न होते. या देशाला यशजींनी प्रसिध्दि मिळवून दिली आहे! आणि आता मी अधिकृत ब्रॅंड ऍंबेसेडरच्या स्वरुपातील हिवाळ्यातील माझ्या पुढच्या सहलीची वाट पाहत आहे. मला असे सांगण्यात आले आहे या मोसमात तिथे जाणे म्हणजे एका संपूर्ण वेगळ्या देशात गेल्याप्रमाणे वाटते.”

श्री क्लाऊडियो झेंप, डायरेक्टर-इंडिया स्विझरलँड टूरिजम म्हणाले, “गुणी,उत्साही आणि धाडसी व्यक्तीमत्वाच्या रणवीरने स्विझरलँडचा सखोल मागोवा घेतला आहे आणि त्याच्या संपदेचा आनंद घेतला आहे. त्याची महत्वाकांक्षा आणि देशासाठी असलेल्या उत्कंठेने आम्हाला त्याला ब्रँड एँबेसेडर बनण्याची विनंती करण्यासाठी भाग पाडले आणि त्याने या ऑफरचा उत्साहाने स्वीकार सुद्धा केला. आपल्या अभूतपूर्व सौंदर्यासोबत चित्राप्रमाणे भासणारा आणि मन मोहून टाकणारा सुट्टीचा अनुभव आपल्या स्विझरलँडमध्ये नेहमी घेता येतो. रणवीरच्या मदतीने आम्हाला स्विझरलँडच्या या सुट्टीच्या या सर्वतोमुखी अनुभवाचे सादरीकरण करता येईल.”

सुश्री रितू शर्मा, डेप्युटी डायरेक्टर, स्विझरलँड टूरिजम इंडिया म्हणाल्या, “स्विझरलँड सुट्टीचा संपूर्ण आस्वाद घेण्यासाठी अतिशय सुयोग्य स्थळ आहे, ज्याचा अनुभव तुम्हाला अनेक दिवसांपर्यंत जरुर लक्षात राहिल. पर्यटकांना साइटसीन, आराम आणि धाडस एकत्रितपणे अनुभवण्यास मिळेल. इथे राहण्यासाठी मुबलकप्रमाणात जागा, चांगल्या दर्जाची व्यंजने आणि स्वागत करणारे लोक हमखास पाहण्यास मिळतात. स्विझरलँड आपल्या बर्फाच्छादित शिखरांसोबत, नितळ सरोवरे, नैसर्गिक भ्रमंती आणि सर्वोत्कृष्ठ परिवहन यंत्रणेसोबत हे सर्व गुणविशेष प्रस्तुत करतो. याची भारतीय पर्यटकांना जरी संपूर्णपणे कल्पना असली तरी रणवीरने स्विझरलँडमधल्या अनेक उत्साहवर्धक गोष्टींचा शोध लावला आहे उदा. हृदयाचा ठोका चुकवणारे अनेक स्काय डायव्हिंग, हेलि-स्किइंग, काइटसर्फिंग, रिव्हर राफ्टिंग, कॅनोयिंग इ. चे अनुभव. स्विझरलँडमधल्या सुट्ट्या आयुष्यभर चीरतरुण राहणा-या आठवणींची ठेव असतात आणि भेट देणारा प्रत्येकजण #inlovewithswitzerland.”

एक निसर्गप्रेमी, धाडसी, आऊटडोअर आणि एक्सट्रिम स्पोर्ट्सचा चाहता म्हणून रणवीर आता पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला स्विझरलँडला जाण्याची स्वप्ने पाहत आहे. आपल्या पुढच्या भेटीमध्ये, रणवीर सेंट मॉरिट्झ- समृध्द आणि प्रसिध्द प्लेग्राऊंड तसेच चित्रबध्द केल्याप्रमाणे भासणा-या टिट्लिसइंगेलबेर्ग गावाला भेट देणार आहे आणि या हिवाळ्यात जादुई दुनियेचा पहिला अनुभव घेणार आहे तसेच अनेक धाडसांचा व देशाच्या स्थानिक संस्कृतीचा आनंद लुटणार आहे.