राष्ट्रीय कनिष्ठ गट टेनिसबॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात बिहार संघाला तर मुलींच्या गटात छत्तीगड संघाला विजेतेपद

hoki

पुणे : 24 वी राष्ट्रीय कनिष्ठ गट टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात बिहार संघाने तर मुलींच्या गटात छत्तीगडने विजेतेपद पटकाविले. जिल्हा क्रीडाधिकारी पुणे चे विजय संतान, मुनव्वर पीरभॉय (सस्थपक हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट,) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम, टेनिसबॉल क्रीकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव इम्रान लारी, टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव मोहम्मद बाबर, आझम स्पोर्ट्‌स ऍकॅडमीचे संचालक गुलजार शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद बाबर यांनी केले, तर आभारप्रदर्शन मजिद सय्यद यांनी केले.

मुलींच्या गटात छत्तीसगड संघाने राजस्थानचा 22 धावांनी पराभव केला. तसेच अंतिम चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये मुलांच्या गटातील अंतिम सामन्यामध्ये बिहार संघाने छत्तीसगड संघाचा 7 गडी राखून पराभव केला.

मुलींच्या गटात विजयी संघाकडून काजल हिने 16 व रेखा हिने नाबाद 15 धावा केल्या. पराभूत संघाकडून हिना हिने सर्वाधिक 15 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगड संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. मुलांच्या गटात विजयी संघाकडून अकिफ बागवान याने नाबाद 25 धावा केल्या. पराभूत संघाकडून ग्यान याने नाबाद 20 धावा केल्या. अकिफ बागवान हा सामनावीर ठरला.