पुणे परिमंडलात 51 हजार वीजग्राहकांनी केला साडेपंधरा कोटी रुपयांचा भरणा

mahavitarn kendr

पुणे : वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी शुक्रवारी (दि.11) मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असलेल्या मुदतीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे परिमंडलातील सुमारे 51 हजार वीजग्राहकांनी 15 कोटी 58 लाख रुपयांचा भरणा केला होता.

रास्तापेठ व गणेशखिंड मंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 42,318 वीजग्राहकांनी 12 कोटी 68 लाख रुपयांचा भरणा केला तर पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील 8700 वीजग्राहकांनी 2 कोटी 90 लाख रुपयांचा वीजबिलांपोटी भरणा केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजबिल भरणा केंद्गांवर बिल भरण्यासाठी ग्राहकांचा ओघ सुरु होता.

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी वीजबिल भरणा केंद्गांतील व्यवस्थेचा वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आढावा घेतला व मार्गदर्शन केले. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिवसभरात अनेक वीजबिल भरणा केंद्गांना भेटी देऊन वीजग्राहकांसाठी केलल्या व्यवस्थेची पाहणी केली. सोबतच सर्व अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील वीजबिल भरणा केंद्गांना भेटी दिल्या.

वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयामुळे वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आज सकाळी पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच 501 वीजबिल भरणा केंद्ग सुरु झाल्यानंतर वीजग्राहकांचा ओघ वाढत गेला. वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता येईल यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह सर्वच केंद्गांवर महावितरणच्या कर्मचार्‍यांची अतिरिक्त स्वरुपात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देत होते व त्यासाठी सहकार्य करीत होते. तसेच जुन्या नोटा स्वीकारण्यासाठीचे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आले.

14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतवीजबिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार
वीजबिलासाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने दि. 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून वैयक्तिक व घरगुती वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. सोमवार, दि. 14 नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक सुटी असली तरी महावितरणने सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहे. ही सर्व भरणा केंद्रे दि. 12 व 13 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत तसेच दि. 14 नोव्हेंबरला सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक वीजग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे असेल तेवढ्या रकमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात घेतले जाणार नाही.