वंचित मुलांच्या विकास व उज्वल भविष्यासाठी होप अँड केअर फाउंडेशनची स्थापना

images

पुणे : समाजाचा विकास व वंचित मुलांची स्वप्नपूर्ती या ध्येयाने प्रेरित होऊन, दि. 14 नोव्हेंबर ,बालदिनाचे औचित्य साधून होप अँड केअर फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे.या उपक्रमामध्ये डॉ.क्षमा पाटणे – खांदोडे आणि हृषीकेश खांदवे यांच्याबरोबरच समाजातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा सहभाग आहे.

आज भारतात सुमारे 4 लाख मुले रस्त्यावर राहतात. त्यातील सुमारे 9000 मुलांना रोज भुकेशी सामना करावा लागतो. 15 % मुले आज व्यसनाधीन आहेत. या मुलांना ना स्वतःच्या भविष्याची चिंता आहे ना आरोग्याची काळजी! डॉ . क्षमा पाटणे-खांदोडे म्हणाल्या, या मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिकाधिक स्वयंसेवी संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. होप अँड केअर फाउंडेशन तळागाळातल्या वंचित मुलांच्या अन्न,वस्त्र,शिक्षण,आरोग्य व विकासासाठी साधने पुरवून त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करणार आहे.

आमच्या संस्थेच्या कामाची सुरूवात श्रीवत्स (बालसंगोपन केंद्र)या संस्थेसाठी ब्लँकेट, स्वेटर्स यांची गरज लक्षात घेऊन डोनेशन कॅम्पने झाली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त अरुण खांदोडे, सौ.राधा खांदोडे आणि हाजी मेहमूद उपस्थित होते.

आम्ही सर्व पुणेकरांना आवाहन करतो कि त्यांनी या उदात्त हेतूसाठी आमच्या संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे,जेणेकरुन समाजातील कोणतीही मुले मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाहीत. केवळ आर्थिक मदत गरजेची नसून वस्तूच्या स्वरूपात देणगी देऊ शकता, जसे की कपडे खेळणी, अन्न, शैक्षणिक मदत, आरोग्य सुविधा इत्यादी