तजुम्मल इस्लामने पटकावले वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्णपदक

tajlim

पुणे : जम्मू काश्मीरमधील 8 वर्षाच्या तजुम्मल इस्लामने वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पीयनशीप ही स्पर्धा इटली येथे नुकतीच झाली. या स्पर्धेमध्ये 90 खेळाडू सहभागी झाले होते. काश्मीर खोर्यातून विजेती होणारी तजुम्मल ही प्रथम मुलगी आहे.  आठव्या वर्षी सुवर्णपदक पटकावून तजुम्मल इस्लामने नवा इतिहास रचला आहे.

मवर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पीयनशीपफ स्पर्धेत सहभागी होण्याकरीता आणि विसा करीता लागणारी आर्थिक मदत असीम फाऊंडेशनफ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेच्या वतीने, असीम फाऊंडेशचे हितचिंतक आणि नागरिकांच्या सहकार्यातून करण्यात आली. तिला मिळालेल्या या मदतीचे तजुम्मल ने चीज केले आहे, असे असीम फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी यांनी सांगितले.