अजरामर होण्यासाठी संगीतातील सखोलता महत्त्वाची : शंकर महादेवन

mahadevan

पुणे : ज्या संगीतात सखोलता असते,जे मनापासून व आत्मियतेने तयार केले जाते ते संगीत कायमच अजरामर ठरते,असे मत प्रसिध्द संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी येथे व्यक्त केले. रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट परफेक्ट स्ट्रोक्स या कार्यक्रमानिमित्त पुणे भेटीवर आलेल्या शंकर महादेवन व प्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी संवाद साधला.

शंकर महादेवन म्हणाले की, संगीत दिग्दर्शक हा खरतरं संगीत डिझाईनर सारखाच असतो.तो आपल्या संगीतातून दिग्दर्शकाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.संगीत देखील प्रयोगासारखेच असते. कारण यातून कलात्मकता सादर होत असते. कट्यार काळजात घुसली चित्रपटाचे संगीत देखील अशाच प्रयोगाचे एक सुदंर उदाहरण आहे,ज्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.तारें जमीन पर चित्रपटातील गाणी कधीही ऐकली तरी ती तितकीच वर्तमानाशी सुसंगत वाटणारी असतील.सैराट चित्रपटाचे संगीत आवडल्याचे त्यांनी सांगितले.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज म्हणाले की, प्रत्येक पिढी ही नावीन्य घेऊन येते.चित्रपट व संगीत हे त्या त्या काळाचे व पिढीचे प्रतिबिंब असते.आजच्या संगीतात एकसुरीपणा आला नसून अनेक चांगली गाणी आजही चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहचत आहेत.संगीत तालबध्द करण्यासाठी प्रत्येक संगीतकार विविध रचनांचा वापर करत असतो. गाणे संगीतबध्द करताना पहिल्यांदा त्यासाठी योग्य चाल, दिग्दर्शकाचा त्या गाण्यामागचा दृष्टिकोन या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.

रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट परफेक्ट स्ट्रोक्सने परिपूर्णता आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांच्या यशाचे गुपित शेअर करण्याकरिता यशस्वीकर्त्यांसाठी उच्च विश्‍वसनीय व्यासपीठ दाखल केले आहे. व्यासपीठ काही प्रसिद्ध व्यक्तींना एकत्र आणण्याद्वारे दर्शकांना प्रेरित करतो, जेथे या प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या संबंधित करिअर्समधील प्रत्येक क्षणांमध्ये परिपूर्णता आणण्याकरिता ओळखले जातात. व्यासपीठ हे नाविन्यपूर्ण व विशिष्ट टॉक शो स्वरुपातील एक कार्यक्रम आहे, जो प्रभावीपणे दर्शकांना सामावून घेतो.

पर्नोद रिकार्ड इंडियाचे सहाय्यक उपाध्यक्ष (विपणन) राजा बॅनर्जी म्हणाले, संगीत हा हिंदी चित्रपटसृष्टीचा आत्मा आहे. आम्ही त्यासोबत आमचे परिपूर्ण क्षण साजरे करतो आणि जेव्हा दुःखी मनाला आनंदित करायचे असते, तेव्हा ते आमच्याकरिता परिपूर्ण सोबती म्हणून काम करते. भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच लोकप्रिय गाण्यांचे मिश्रण देशभरात प्रचलितच आहे. आणि या विश्‍वासासह, आम्हाला रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट परफेक्ट स्ट्रोक्सचा नवीन सीझन सादर करताना अभिमान वाटत आहे, जो रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्टच्या मेक इट परफेक्ट या तत्त्वाला साजरे करेल. भारतीय चित्रपटसृष्टीमधील दिग्गज व्यक्तींसोबतच्या आमच्या सातत्यपूर्ण सहयोगाच्या माध्यमातून, आम्ही या दिग्गज व्यक्तींसोबत चित्रपटामधील परिपूर्ण संगीत बनविण्याच्या कलेवरील अनोखा अनुभव प्रदान करण्याचा हेतू राखतो.