ढोले पाटील महाविद्यालयात ‘याद करो कुर्बाणी’ पंधरवडा

1 (11)_1

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धां, सीमेवरील जवानांना पाठविल्या राख्या  

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला यंदा सत्तर वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात याद करो कुर्बाणी.. या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते.९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट पर्यंत विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .यामध्ये सीमेवरील जवानांना विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या व मुलांनी बनविलेली शुभेच्छा पत्रे पाठविण्यात आली.महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे,कबड्डी व मॅरेथॉन स्पर्धा,वृक्षा रोपण कार्यक्रम,देश भक्तीपर गीत गायन,नाटके -एकांकिकांचे आयोजन,चित्रकला स्पर्धा,स्वातंत्र्य समर आढावात्मक कार्यक्रम,अवयव दानाची प्रेरणा देणारा कार्यक्रम,देश प्रेमाचे स्फुलिंग चेतविणारे चित्रपट प्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमांचे आयोजन प्रा.श्रीकांत जगताप,प्रा.सुप्रिया शेळके,प्रा.मोमीता चॅटर्जी,प्रा.निताशा चौधरी,प्रा.दिपक पिंगळे,प्रा.अमित झोरे,प्रा.स्वप्नील धावडे,प्रा.विद्या भांडवलकर,प्रा.जगदीश बैस यांनी केले होते.त्यांना संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील,व्यवस्थापक ब्रिगेडियर डॉ.रणधीर भाटीया,प्राचार्य डॉ.सतीश आलमपल्लेवार,उपप्राचार्य प्रा.अभिजीत दंडवते,प्रा.प्रकाश माळी यांचे मार्गदर्शन लाभले.