टेलिनॉर इंडिया तर्फे विद्यार्थ्यांमध्ये जीवन विम्याविषयी जनजागृती

telinor

पुणे : या बालदिनाच्या निमित्ताने टेलिनॉर इंडियाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जीवन विम्याविषयी जनजागृती करण्याकरिता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 15 नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या उपक्रमामध्ये श्रीराम लाईफ व मायक्रोएनशुअर या भागीदारांसह टेलिनॉर विद्यार्थ्यांमध्ये जीवन विम्याचे महत्व सांगणारा उपक्रम सुरु केला आहे.

याअंतर्गत टेलिनॉरच्या सर्व परिमंडळातील कर्मचारी विद्यार्थ्यांना पेन्सिलचे वाटप करतील व त्यांना परिवारासाठी असलेल्या जीवन विम्याचे फायदे सांगणारे पत्रकांचे वाटप करणार आहे. यामध्ये कंपनीचे कर्मचारी देशाच्या 7 राज्यातील 237 शहरातील 4000 शाळांपर्यंत पोहचणार आहेत.