वाहतूक समस्येची उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्याकडून भर पावसात पाहणी

20160824_110808

कर्वेनगर चौक, कर्वे शिक्षण संस्था, पाणंद रस्ता व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक समस्यवर विविध उपाययोजना करण्याच्या सूचना मान्य

पुणे: कर्वेनगर चौकातील रेंगाळलेले उड्डाण पुलाचे काम आणि एकूणच या परिसरातील विविध प्रश्नांमुळे येथील वाहतूक समस्या गंभीर झाली असून वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना नागरिकांची दमछाक होत आहे. येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वतः पाहणी करून योग्य निर्णय घ्यावा व परिसरातील दहा हजाराहून अधिक विद्यार्थिनींना दिलासा द्यावा, अशी विनंती भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली. त्यानंतर डॉ.  मुंडे यांनी या परिसराला भेट दिली व नागरिकांची मते जाणून घेऊन उपयुक्त सूचना केल्या. भर पावसात पाहणी करताना डॉ मुंडे यांनी काही बाबींमध्ये त्वरित कार्यवाहीचे आदेश देऊन आपल्या धडाकेबाज कार्याची चुणूक दाखवली. या वेळी माजी नगरसेवक शिवरामभाऊ मेंगडे, शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर, विभीषण मुंडे, नंदकुमार घाटे, दत्ताजी देशमुख, दीपक राव, मयूर आटाळे, ह्रिषीकेश साळी, जगदीश डिंगरे, कर्वे शिक्षण संस्थेचे उपसचिव मुकुंद जोशी, संचालक किरण बराटे, श्रीपाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक महेश सरतापे, पोलीस निरीक्षक पंढरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.