प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचा सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते  सत्कार

Prof. Bennur

पुणे : लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्क यांच्यातर्फे ज्येष्ठ प्रबोधनवादी विचारवंत प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचा ८० व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा सत्कार समारंभ होणार आहे.

      मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. चैत्रा रेडकर, सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निजामुद्दीन शेख, सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. ऋतुराज बुवा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘समंजस संवाद’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी दिली.