शनिवार वाड्यावर सलामी ‘युवोत्सवाच्या’ जल्लोषाची

unnamed

पुणे, प्रतिनिधी:  ‘जुनी चौकट मोडू या ना…नव्या वाटा शोधू या ना’ हा सूर आहे सध्याच्या तरूणाईच्या जगण्याचा. अगदी छोट्या आनंददायी प्रसंगांपासून ते आयुष्यातीलकरिअरसारख्या मोठ्या यशाला गवसणी घालण्यापर्यंतचे प्रत्येक क्षण तरूणाई मनापासून साजरे करते. सरत्या वर्षाची पाने पलटताना नव्या अध्यायाचे पानउघडण्यातही तरूणाईमध्ये वेगळेच चैतन्य असते. नवं वर्ष हे फक्त कॅलेंडरचे पान बदलणे नव्हे, तर आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि नव्यादिशा…नवे आकाश कवेत घेण्याचा विचार म्हणून भिनावा यासाठी तरूणाईच्या मनातील नव्या वर्षाच्या स्वागताची कल्पनाही अशीच भन्नाट असते. याचसळसळत्या उत्साही तरूणाईसोबत झी युवा या खास तरूणाईच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब असलेल्या चॅनलने पुणेकरांना पर्वणी दिली ती अस्सल मराठी बाणा  जपणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताची … . बाजीराव पेशवे आणि मस्तानीच्या हळूवार नात्याच्या पाऊलखुणा असलेल्या पुण्यातील शनिवार वाड्याच्या प्रांगणात;  झीयुवावरील कलाकार आणि मराठी इंडस्ट्रीच्या तारे तारकांनी झी युवाचा पहिला  ग्रँड कार्यक्रम  ” युवोत्सव ” गुरुवारी १५ डिसेंबरला सादर केला . या कार्यक्रमात गाणी, स्किट आणि डान्सच्या विविध परफॉर्मन्सचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला .

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर विनोदाची पेरणी करणाऱ्या स्किटमध्ये हसता हसता अंतर्मुख करण्याची वेगळीच ताकद असते. यासाठी छोट्यापडद्यावर स्टँडअप कॉमेडीचा स्टेज गाजवलेल्या विनोदवीरांनी आणि झी युवाच्या प्रसिद्ध कलाकारांनी, दारूशिवाय पार्टी , नवीन दिवसाचा शोध , कोणतीही गोष्टसेलिब्रेट करण्याचा सध्याचा बदलता ट्रेंड,  सोशलमिडियावरच्या पोस्ट लाइक आणि कमेंटचा खेळ, नव्या सणांच्या मालिकेत हरवत चाललेले पारंपरिक उत्सवाचेमहत्व, वेगवेगळे डे सेलिब्रेशन अश्या विषयांवरील कोपरखळ्या आणि चिमटे घेणारे स्किट सादर केले आणि हेच या शोची खासियत ठरली . विशाखा सुभेदार, शशिकांत केरकर, हेमांगी कवी आणि कृतिका देव ही विनोदाची चौकडीने  स्किटचा स्टेज गाजवलाच पण त्यांच्या बरोबर झी युवाच्या मालिकांमधील शशांक केतकर, मधुरा कुलकर्णी . मिताली मयेकर , शुभंकर तावडे , रसिका वेंगुर्लेकर, ओंकार राऊत,  विवेक सांगळे , सक्षम कुलकर्णी , ओमकार गोवर्धन , सिद्धी कारखानीस , केतकी पालव ,  अपूर्व रांजणेकर ,  स्नेहा चव्हाण  या सर्व कलाकारांनी केलेल्या जबरदस्त सादरीकरनाने  प्रेक्षकही त्यांच्या प्रेमात पडले.

     समोर तरूणाई असताना नव्या वर्षाच्या स्वागतसोहळ्यात डान्ससाठी पाय थिरकणार नाहीत असं होऊच शकत नाही.  वैभव तत्ववादी, अमृताखानविलकर , मानसी नाईक, ऋतुजा शिंदे, सुमेधा मुदगलकर, मृण्मयी गोडबोले या मराठी स्टार्सचा डान्सधमाका असा  काही  रंगला कि पुणेकरांनी अख्खा  शनिवार वाडा डोक्यावर घेतला . यामध्ये लोककलेचा बाज असलेल्या गोंधळनृत्यासह सैनिकांच्या वेशभूषेतील ‘मल्हारी, पिंगा फेटा हा हटके फॅशन शो आणि रँपवॉक, झोकून देणाऱ्या प्रेमात वेडं करणारे झिंगाट साँग, लावणीचं फ्यूजन, मेलडी साँग आणि डान्स शो टिपेला पोहोचवणारा ढोलताशाचा गजर आणि जोडीलामायकल जॅक्सन असे धमाल स्किट यामधून “युवोत्सव” पाहण्याचा रंग क्षणोक्षणी चढत गेला आणि त्यावर पुणेकर मनापासून थिरकलेही .  या सर्व धमालमस्तीबरोबरच विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळीच शान आणली . 

      अभिनेता आणि लेखक प्रियदर्शन, स्टँड कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला शशिकांत केरकर, यांनी लोकांना  पोट दुखेपर्यंत हसवले .  छोट्या आणिमोठ्या पडद्यावरचा तरूणाईचा चेहरा अमेय वाघ आणि सर्वांची लाडकी स्पृहा जोशी या दोघांनीही उत्कृष्ट असे सूत्र संचालन करत झी युवाच्या युवोत्सवाला  एकावेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा  आणि मोस्ट रोमँटिक  असा अभिनेता स्वप्नील जोशी आणि तरुणाईची आजची  धकधक गर्लप्राथर्ना बेहेरे यांच्या लाजवाब परफॉर्मन्सने या झी युवाच्या “युवोत्सव ” या नवं वर्षाच्या आगमनाच्या कार्यक्रमाची सांगता केली. ह्या कार्यक्रमाचे झी युवावर १ जानेवारीला प्रक्षेपण होईल.