जागतिक संसदेसाठी विषमता निर्मूलन हवे

143
पुणे : “आपण जाती-देश-धर्मामध्ये स्वत:ला वाटून घेतले आहे. मात्र आपल्याला ज्याने निर्माण केले त्या निर्मात्याला हे कदापिही मान्य असणार नाही. आपण मूर्तींची पूजा करतो पण मानव रुपी शरीरामध्ये जो देव आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या प्रत्येकामध्ये एक ठिणगी आहे, त्याला ज्वाळेचे रुप द्या.आपल्यातील विषमता, हिंसा, जातीयवाद याला तिलांजली देण्यासाठी जागतिक संसदेच्या उभारणीची नितांत गरज आहे.” असे मत ड्ब्ल्यूसीपीएचे मानद सल्लागार  स्वामी अग्निवेश यांनी व्यक्त केले.  या वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अ‍ॅण्ड पार्लमेंट असोसिएशन, अमेरिका, विश्‍वशांती केंद्र (आळ्ंदी), माइर्स एमआयटी पुणे व श्री रामानुज मिशन ट्रस्ट, तमिळनाडू यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या बिल्डिंग द वर्ल्ड् पार्लमेंट – जागतिक संसदेची उभारणी या विषयावरील आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषदेमध्येच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषण देताना ते बोलत होते.
  यावेळी जगविख्यात संगणतज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भाटकर, एसनडीटी विद्यापीट्ठाच्या कुलगुरु डॉ. शशीकला वंजारी, ड्ब्लुएसपीएचे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन, , विश्‍वशांती केंद्र (आळ्ंदी), माइर्स एमआयटी पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, डड्ब्लुएसपीएच्या आंतराष्ट्रीय सल्लागार प्रा. विजया मूर्ती, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वामी अग्निवेश म्हणाले, “ माणूस जे कपडे घालतो, त्यावरून त्याची ओळ्ख व्हायला नको तर  माझे विचार, आचार यावरून माझी ओळ्ख व्हावी. तुम्ही जगात कुठेही गेलात किंवा गूगलवर सर्च केले तर तुम्हाला हजारो, लाखो डॉक्टर, इंजिनिअर मिळ्तील पण शासनकर्ते मात्र मिळणार नाहीत. कारण ही संकल्पनाच अगदी निराळी आहे. 2014 मध्ये मिलीटरीवर जवळ्पास 70 हजार बिलीअन डॉलर्स खर्च केले पण जर त्यातील फक्त 10 % जरी जगातील गरिबी हटविण्यासाठी दिले असते, तर एकही माणूस गरीब दिसला नसता. जगात युद्ध बंद झाली तर शस्त्रांच्या दलालांची दुकाने बंद होतील. आजही स्त्रियांवर अनेक वेळा अत्याचार व अन्याय होताना दिसून येतो. याला सर्वस्वी जबाबदार आपली  पितृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. स्त्रियांना-मुलींना जर समान संधी दिली गेली तर त्या पुरुषांपेक्षाही जास्त प्रगती करुन दाखवू शकतात. उदा.माहिती-तंत्रज्ञान. आज जर वर्ल्ड पार्लमेंट बनवायचे असेल, तर समानतेसोबतच जातपात नष्ट केली पाहिजे. आपण फक्त कोशावस्थेत जगत आहोत. कधी जातीपातीचा, कधी धर्मांचा तर कधी त्वचेच्या रंगाचा. जर संधी दिली तर प्रत्येकजण आपली पात्रता सिद्ध करेल. आपल्या सर्वांना  चुकीची विचारसरणी, जातीयवाद पूणर्र्: नष्ट करायचा आहे. संवाद हे हिंसेला संपवण्याचे एकमेव माध्यम आहे. ” 
डॉ. विजय भटकर म्हणाले, “जागतिक संसद उभारणीची ही संकल्पना अत्यंत उत्तम असली तरी ती खूप अवघड आहे. खरतरं ही संकल्पना सर्व मानवकल्याणाची आहे. आज आपण अनेक समस्यांना तोंड देत आहोत. त्यात गरीबी, विषमता, हिंसा, जातीयवाद आहेत. मात्र जर आपण एकत्र आलो नाही तर जगूच शकणार नाही. आपल्याला अत्यंत महान आध्यात्मिक संतांची परंपरा आहे. त्यांनी शांतीची शिकवण दिली आहे. त्यामुळे आपल्याला त्याच मार्गाने जायचे आहे. ” 
डॉ. ग्लेन मार्टिन म्हणाले की, “आज संपूर्ण जग चुकीच्या दिशेने जात आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जग सध्या काही समस्यांना तोंड देत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी एमआयटीच्या माध्यमातून सुरू असलेली परिषदेची ही संकल्पना अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त आहे. हे विश्‍वची माझे घर म्हणत सर्व मनुष्यप्राण्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याचसाठी ही विश्‍व संसद भरविली गेली आहे. तर डॉ. शशीकला वंजारी म्हणाल्या, “भारतीय म्हणून आपणां सर्वांना निसर्गाची पूजा करणे माहिती आहे. आपला पर्यावरण रक्षणावर विश्‍वास आहे. आज पृथ्वीला वाचवण्यासाठी निसर्गाचा समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे. ”
डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी विश्‍वसंसद संकल्पनेचा हेतु सर्व मानवजातीला या माध्यमातून एकत्र आणण्याचा असल्याचे सांगितले. आज सर्वांचे धर्म, जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी आध्यात्मिक दृष्टी मात्र एकच आहे. डॉ. ग्लेन मार्टिन यांची जागतिक संसदेची संकल्पना ही अत्यंत आदर्श आहे. खरतरं आजची ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना नवीन वाट्ते आहे. मात्र भारतात ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वीची वसुधैव कुटुंबकम् अशी आहे. या संकल्पनेला भारतीय इतिहास आहे. 
वेद्प्रकाश वेदिक म्हणाले की, “माझे-तुझे करणे ही अत्यंत कोत्या मनाची लक्षणे आहेत. पण वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना मोठ्या मनाचे लक्षण दाखवणारी आहे. वैयक्तिक पातळीवर मला ही जागतिक संसदेची संकल्पना अत्यंत प्रिय आहे. ”
प्रा. विजया मूर्ती यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.